पंजाबमधील लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आहे. जसविंदर सिंग मुलतानी, असे त्याचे नाव सांगितले जात आहे. लुधियाना आणि देशातील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचणार्या शिख फॉर जस्टिसचा (एसएफजे) सक्रिय सदस्य आहे. जसविंदर सिंग मुलतानी याची जर्मनीत तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे.
दिल्ली आणि मुंबईतही बॉम्बस्फोट घडवण्याचा त्याचा कट होता असा संशय व्यक्त केला जात आहे. लुधियानासह भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटात मुलतानीचा सहभाग असल्याचा संशय एजन्सीला आहे. लुधियाना न्यायालयात २४ डिसेंबरला स्फोट झाला होता. या स्फोटात स्फोटात गगनदीप सिंग हा ठार झाला तर ५ जण जखमी झाले.