गोव्याचे माजी मुख्यमंत्री, तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची काल पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवड झाली.
लुईझिन फालेरो यांनी काही महिन्यांपूर्वीच कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फालेरो यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती. श्रीमती अर्पिता घोष यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.
गेल्या आठवड्यातच फालेरो यांनी काल राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. नावेली मतदारसंघातून कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेशावेळीच त्यांना राज्यसभा उमेदवारीचे आश्वासन पक्षाने दिले होते. त्या आश्वासनाची पक्षाने पूर्तता केली.