केंद्रातील तसेच राज्यांतील व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एक स्तुत्य प्रस्ताव सादर केला असून तो मंजूर झाल्यास केंद्रातील पाच व राज्यांतील चार अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनाच लाल दिव्याचा विशेषाधिकार मिळणार आहे. केंद्रात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या पाच प्रमुख पदांसाठीच लाल दिवा गाडी दिली जावी, तर राज्यांमध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनाचा हा अधिकार असावा असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आदींचे मत मागविले आहे.