‘लायली वाट पणजी शहराची’

0
14

स्मार्ट सिटीच्या नावाखाली सध्या पणजी शहराची जी दुरवस्था केली आहे, ती एका युवकाने आपल्या गीतातून प्रभावीपणे मांडली आहे. ‘लायली वाट पणजी शहराची’ अशा आशयाच्या गायलेल्या या गीताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पणजी शहरात सुरू असलेल्या खोदकामच्या चित्रिकरणासह त्याने हे गीत गायलेले आहे.

प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीची वाट लावली आहे. आपल्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता खोदून ठेवलेला आहे. तसेच, पणजीतील सांतइनेज, मार्केट, 18 जून रस्ता, मळा, मुख्य रस्ते विविध वाहिन्या घालण्याच्या नावाखाली खोदलेले आहेत, असेही या गीतात म्हटले आहे.
पणजी शहरातील विविध कार्यालये, इमारतींमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्याने नोकरदार आणि नागरिकांची गैरसोय मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे एका युवकाने गीतातून स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत ताशेरे ओढले आहेत.