लाच मागितल्या प्रकरणी २ सरकारी कर्मचारी अटकेत

0
28

पोलीस खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फोंड्यातील एका तरुणाकडे २० लाख रुपयांची मागणी करणार्‍या दोन सरकारी कर्मचार्‍यांना फोंडा पोलिसांनी काल अटक केली. या प्रकरणी मेरशी येथील अपना घरचा कर्मचारी सचिन पोकळेे (ढवळी) आणि पर्वरी सचिवालयातील कर्मचारी पंकज फडते (मोरजी) यांना अटक केली आहे. सदर युवकाने पोलीस खात्यात उपनिरीक्षक भरतीसाठी अर्ज केला होता.