लाच प्रकरणी कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक निलंबित

0
7

कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना काल सेवेतून निलंबित केल्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी जारी केला.
कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर बदली होण्यापूर्वी ते कोलवा पोलीस स्थानकावर निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शॅकमालकाकडून 10 लाख रुपयांची लाच घेतली
होती.

या प्रकरणात सदर शॅकमालकाने कोणतीही तक्रार केलेली नव्हती; मात्र आपचे काणकोणातील नेते संदेश तेळेकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तुकाराम चव्हाण यांना सदर रक्कम त्या शॅकमालकाला परत करण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणी त्यांची खात्यांतर्गत प्राथमिक चौकशी सुरू होती, त्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने त्यांना सेवेतून काल निलंबित करण्यात आले.