कोरोना विषाणूवरील लस जानेवारी २०२१पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तसेच लस आल्यानंतर विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा ती घेईन असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोनावरील लस पहिल्यांदा ज्या लोकांना आत्यंतिक गरज आहे अशा लोकांसाठीच प्रथम उपलब्ध केली जाईल असे ते म्हणाले.