लष्कर-ए-तोयबाच्य २ अतिरेक्यांचा खात्मा

0
23

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. एका गावात हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्यांचा घेराव घालून सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, शनिवारी रात्री एका गावात लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. काही तास चाललेल्या या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत ठार झालेला एक दहशतवादी हैदर हा पाकिस्तानी असून, तो लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. बर्‍याच काळापासून सुरक्षा दले त्याच्या शोधात होती. हैदरचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. या चकमकीत ठार झालेल्या दुसर्‍या दहशतवाद्याचे नाव शाहबाज शाह असे आहे, तो काश्मीरचा रहिवासी होता.