लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा

0
136

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडातील राजवार भागात झालेल्या चकमकीत दोन परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाचा कमांडर हैदर याचादेखील समावेश आहे. परंतु, या ऑपरेशनमध्ये दोन अधिकार्‍यांसहीत पाच जवानही शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे.

हंदवाडा एन्काऊंटर दरम्यान लष्कर कमांडर हैदर याला ठार करण्यात आले आहे. तर दुसर्‍याची ओळख अद्याप पटलेली नाही. शुक्रवारी सेनेला दाट जंगल असलेल्या या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते.