भारताचे लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी काल सियाचेन हिमनदी भागाला भेट दिली. जम्मू काश्मीरमधील लडाखच्या तीन दिवसीय दौर्यावर लष्कर प्रमुख येथे आले आहेत. यावेळी सुहाग यांनी या क्षेत्रात लढताना आहुती दिलेल्या जवानांच्या स्मारकारवर पुष्पांजली अर्पण केली. गेल्या ३१ जानेवारी रोजी लष्कर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या भागात त्यांची ही पहिलीच भेट आहे. त्यांच्यासोबत यावेळी लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा हेही होते.