लडाखमध्ये घुसखोरी नाही

0
164

>> सर्वपक्षीय बैठकीत मोदींची ग्वाही

लडाखमध्ये चीनकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही. सीमेवर आपले जवान पर्वताप्रमाणे ठाम उभे आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. काल चीनद्वारे लडाखमध्ये झालेल्या चकमकीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी त्या बैठकीनंतर ते बोलत होते. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या माझ्यासाठी महत्त्वाच्या असून सर्व पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, माकपचे सीताराम येच्युरी, राष्ट्रीय जनता दलाचे नीतीशकुमार, बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आदी उपस्थित होते.