>> खाणपट्ट्यांचे बेकायदा नूतनीकरण
लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी खाण लीज नूतनीकरण प्रकरणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवन कुमार सेन, खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांना नोटीस बजावली असून ७ मेपर्यंत उत्तर देण्याचा आदेश काल दिला.
लोकायुक्तांकडे गोवा फाउंडेशनने ८८ खाणींच्या लीज नूतनीकरण प्रकरणी तक्रार केली आहे. गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात राज्यातील दुसर्या टप्प्यातील खाण लीज नूतनीकरण प्रकरणी याचिका दाखल केली होती.