लक्ष्मण पै यांना ‘कला सन्मान पुरस्कार’ प्रदान

0
424

>> प्रफुल्ला डहाणुकर आर्ट फाऊंडेशनचा कलानंद २०१७

 

प्रफुल्ला डहाणुकर आर्ट फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार काल बुधवारी कला अकादमीत दीननाथ मंगेशकर कला मंदिरात थोर चित्रकार लक्ष्मण पै यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनतर्फे ‘कलानंद २०१७’ च्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा चेंबर ऑफ कॉमर्सछे अध्यक्ष तथा एनआरबी उद्योग समूहाचे अध्यक्ष नारायण बांदेकर, सन्माननीय पाहुणे म्हणून उद्योेगपती यतीश धेंपे, चित्रकार जयश्री पैलवान, रवींद्र साळवे, हनुमान कांबळी, कीर्तीकुमार प्रभू, भारतीय जीवन विमाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक वरुणकुमार खान उपस्थित होते. यावेळी वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री. बांदेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले.
इतर पुरस्कार प्राप्त गोमंतकीय चित्रकारांत स्वप्नेश वायंगणकर, सागर नाईक मुळे, सुनील चावडीकर, अमरीश पार्सेकर, वत्सला हेदे, ग्लेन फर्नांडिस, वितेश नाईक, विजय भंडारे, कौशल्य गडेकर, राजेंद्र म्हार्दोळकर, चंदन नाईक गावकर, सिद्धार्थ गायतोंडे, हर्षा मांडूरकर, दत्तप्रसाद नाईक, प्रीतेश नाईक, राजेश साळगावकर, नंदिनी रायकर, दिप्तेश वेर्णेकर यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्योती धवल मेहता यांना गोवा राज्य महिला चित्रकार तर रोहित भोसले यांना पणजी शहर चित्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सोहळ्याची सुरुवात पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने झाली.