लंकेविरुद्ध भारताचा धावपर्वत

0
137

>> पवन शहाचे विक्रमी द्विशतक

भारताचा १९ वर्षांखालील खेळाडू पवन शहा याने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या युवा कसोटी सामन्यात दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदविताना इतिहास रचला. पुण्याच्या १८ वर्षीय पवनने ३३२ चेंडूंचा सामना करताना ३३ चौकार व १ षटकारासह २८२ धावांची खेळी केली.

सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पिक याच्या नावावर आहे. त्याने १९९५ साली भारताविरुद्ध मेलबर्न येथे नाबाद ३०४ धावा चोपल्या होत्या. पवनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव काल बुधवारी आपला पहिला डाव ८ बाद ६१३ धावांवर घोषित करत लंकेची ४ बाद १४० अशी स्थिती केली.
युवा कसोटीत द्विशतक झळकावणारा पवन हा केवळ दुसरा भारतीय आहे. तन्मय श्रीवास्तव याने २००६ साली सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध पेशावर येथे २२० धावांची खेळी करत ऐतिहासिक कामगिरी करत असे करणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळविला होता. या संघात चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, पीयुष चावला व इशांत शर्मा यांचा समावेश होता.

पहिल्या दिवसाच्या १७७ धावांवरून काल पुढे खेळताना पवन श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. विचित्र परेरा याने टाकलेल्या डावातील १०८व्या षटकात त्याने सलग सहा चौकार लगावून अजून मोठी कामगिरी केली. १९८२ साली संदीप पाटील यांनी मँचेस्टर येथे बॉब विलीसच्या गोलंदाजीवर सहा षटकार लगावले होते. परंतु, त्यावेळी विलीस यांनी नो बॉलच्या रुपात एक चेंडू अधिक टाकला होता. शहा याने काल निखिल वधेरा (६४) याच्या जोडीने १६७ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेकडून कामिल मिशारा (४४) व पासिंदू सूर्यबदारा (नाबाद ५१) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताकडून डावखुरा मध्यमगती गोलंदाज मोहित जांगरा याने ४३ धावांत ३ गडी बाद केले. संथगती गोलंदाज देसाईने मिशारा याचा महत्त्त्त्वपूर्ण बळी घेतला. आज सामन्याचा तिसरा दिवस असून लंकेचा डाव लवकर गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादण्याचा भारताचा प्रयत्न असेल.