रोहित मोन्सेरात तिसऱ्यांदा महापौर

0
32

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पणजीच्या महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी बुधवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक घेतली जाणार आहे. महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज काल दाखल झाला. तसेच उपमहापौरपदासाठी संजय नाईक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.