17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर

0
2

मुंबईच्या पवई येथे 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना, आरोपी रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही आर्यावर गोळी चालवली. यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सर्व 17 मुलांना आर्याच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना मुंबईतील पवई परिसरात घडली असून, पोलिसांनी यशस्वीपणे मुलांना सुरक्षित केले आहे. पण 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.रोहित आर्याने एक व्हिडीओ जारी करून आग लावून देण्याची धमकीदेखील दिली होती.