रोहन खंवटे भाजपच्या वाटेवर?

0
11

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी चालवली अहे. त्यासाठी त्यांची भाजपच्या नेत्यांशी सध्या बोलणी चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर विश्‍वजीत राणे यांनी लगेच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

काही काळानंतर सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी भाजपप्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेसच्या १० आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मगोचे आमदार दीपक पाऊसकर व बाबू आजगावकर यांनीही त्यापूवीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राज्यात २०१७ मध्ये जेव्हा मनोहर पर्रीकर यांनी मगो व गोवा फॉरवर्ड यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते तेव्हा अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमदार रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.