
असा पाच सेटमध्ये मोडून काढत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. पहिला सेट खिशात घातल्यानंतर तिसरा व पाचवा सेंट जिंकून त्याने अजिंक्यपद निश्चित केले. या कामगिरीसह फेडरर पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू बनला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकण्याची त्याची ही सहावी वेळ आहे. फेडररचे हे त्याच्या कारकिर्दीतील विसावे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. मागील वर्षीही फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. आतापर्यंत फेडररने २००४, २००६, २००७, २०१०, २०१७, २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनवर मोहोर उमटवली आहे. विम्बलडन स्पर्धेचा विचार केला तर २००३ पासून २००७पर्यंत सलग पाच वेळा ही स्पर्धा फेडररने जिंकली आहे आणि युएस ओपनचे ही २००४ ते २००८ असे सलग पाच वेळा जेतेपद पटकावले आहे.
बोपण्णा-बाबोस जोडीला उपविजेतेपद
मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णाआणि त्याची हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. पहिला सेट जिंकल्यानंतरही सामना गमावल्याने या द्वयीला निराशा लपवता आली नाही.
अंतिम फेरीत बोपण्णा-बाबोस जोडीला क्रोएशियाच्या पाविच आणि कॅनडाच्या दाब्रोवस्की या जोडीने ६-२, ४-६ आणि ९-११ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. हा सामना १ तास ८ मिनिटे रंगला.