कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित सुनील भोमकर याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या रेस्टॉरंटवरील हल्ला प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जात आहे. या हल्लाप्रकरणी आत्तापर्यंत नऊजणांना अटक करण्यात आली आहे.
त्यात व्यावसायिक गजेंद्र सिंग, राहुल राठोड, सुनील राठोड व इतरांचा समावेश आहे. या रेस्टॉरंटवर आत्तापर्यंत तीनवेळा हल्ला करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केली नाही. नोव्हेंबर २०२० मधील पहिल्या हल्ल्याप्रकरणी संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असा दावा रेस्टॉरंटच्या मालकाने केला आहे