नवरील धान्य मिळावे, यासाठी रेशनकार्डासाठीची उत्पन्न मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख रुपये अशी वाढवण्यात येणार असल्याचे काल नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले.
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयां पेक्षा जास्त आहे, त्यांची रेशनकार्डे रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांना रेशनवरील धान्य मिळत नाही. मात्र, आता महागाई खूपच वाढलेली असल्याने आता रेशनकार्डासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 5 लाखांवरून 7 लाख रुपये अशी वाढवण्यात येणार असल्याचे नाईक म्हणाले. हा बदल झाल्यानंतर ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये आहे, त्यांनाही रेशनकार्डावरील धान्य मिळू शकेल. मात्र ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असेल, त्यांना हे धान्य मिळू शकणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात जास्त महागाई असल्याने खात्याने तसा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना रेशनवरील धान्य मिळत नसल्याचे नाईक म्हणाले.
स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्यांना हा व्यवसाय करणे किफायतशीर व्हावे यासाठी त्यांना आता सरकार मासिक 9500 रुपये देत असल्याची माहिती नाईक यांनी दिली. त्यांना लागणारी स्टेशनरी, वीज बिल, वाहतूक आदी खर्चासाठी हे पैसे असल्याचे नाईक म्हणाले. सर्व रेशनधान्य दुकानांची रंगरंगोटीही करण्यात आली असून, सर्व दुकानांसाठी एकच रंग निवडून ही रंगरंगोटी करण्यात आली असल्याची माहिती नाईक
यांनी दिली.