गोव्यात जन्मलेले व श्रीलंकेला कर्मभूमी केलेले १७व्या शतकातील रेव्ह. जोसेफ वाझ यांना संतपद निश्चित झाले आहे. काल पोप फ्रांसिस यांनी वाझ यांच्या ‘कॅनोनायझेशन’वर शिक्कामोर्तब केले. संतपदासाठी दोन चमत्कारांची गरज असते मात्र पोप फ्रांसिस यांनी नियम शिथिल करून एकाच चमत्काराच्या नोंदीनंतर रेव्ह. वाझ यांच्या संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे. जानेवारीतील श्रीलंका दौर्यात पोप रेव्ह. वाझ यांच्या संतपदाची अधिकृतपणे घोषणा करण्याची शक्यता आहे.