रेल्वे स्थानकांचा विकास खासगीकरणातून शक्य : मोदी

0
129

देशातील रेल्वे सुविधा १०० वर्षांपूर्वी होत्या तशाच आहेत. रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करून विकास करणे शक्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुवाहाटी-मेघालय या मार्गावर पहिल्या रेल्वेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. आपण १० ते १२ ठिकाणी तसा प्रयोग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जमिनीचे भाव वाढले आहेत, अशा स्थितीत रेल्वेने आपल्या मालमत्ता पत म्हणून वापरून खासगी भागिदारांना त्यावर चांगली हॉटेल्स व इतर सुविधा उभारण्यासाठी द्याव्यात असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेचा शुभारंभ केल्यानंतर मिझोरम येथे त्यांनी रेल्वे मार्गाचा शिलान्यास केला.