रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे काल बुधवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. सुरेश अंगडी यांना या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे, सुरेश अंगडी यांचे निधन ही दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे.