रेल्वेत प्रवाशांना मिळणार पुन्हा शिजवलेले अन्न

0
18

रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी पुन्हा जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न देणे रेल्वे पुन्हा सुरू करणार आहे. कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे ट्रेनमध्ये जेवण देण्याची सुविधा बंद करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एका पत्रात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.

‘रेडी टू इट’ जेवणही प्रवाशांना दिले जाणार आहे. सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे, प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या गरजा आणि देशभरातील भोजनालये, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि अशा इतर ठिकाणी कोविड लॉकडाउन निर्बंध शिथिल करणे लक्षात घेता, रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडी टू इट फूडची सेवाही सुरू राहील असे पत्रात म्हटले आहे. कोविड-१९ साथीचा प्रसार रोखण्यासाठी त्यावर बंदी घातली होती.