म्हापसा (न. प्र.)
देऊळवाडा, धारगळ येथील संचिता संजय साळगावकर (वय ४८) ही विवाहित शेतकरी महिला रेल्वेचा रूळ ओलांडताना रेल्वेला आपटून जागीच ठार झाली. सदर दुर्घटना काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार ती शेतातील कापणी केलेल्या भातावर प्लास्टिक झाकण्यासाठी घेऊन जात होती. शेती रेल्वे रुळाच्या पलीकडे असून रेल्वे रूळ ओलांडताना ती अचानक रेल्वेखाली आली. सोबत असलेली प्लास्टिक व साडी रेल्वेत अडकल्याने ती गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्युमुखी पडली. पेडणे पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे.