रेल्वेचे तात्काळ तिकीट दर वाढले

0
82

रेल्वेचे तात्काळ तिकीट दरासाठी नवी प्रणाली लागू करण्यात आली असून त्याचा प्रवाशांना मोठा ङ्गटका बसणार आहे. तात्काळ तिकीटांचा ५० % कोटा संपल्यानंतर पुढील ५० टक्के तिकीटांसाठी वाढीव दर आकारण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे तात्काळ तिकीटांचा ५० % कोट्याची विक्री झाल्यानंतर उर्वरित ५० % तिकीटांसाठी प्रत्येकी १० टक्के तिकीटांच्या कोट्याला २० टक्क्यांप्रमाणे वाढीव दर आकारले जाणार आहेत. हे दर वाढत जाणार आहेत. तातडीने हा निर्णय लागू करण्याचे परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे.