रेल्वेची धडक बसल्याने वास्कोत मजुराचा मत्यू

0
5

वास्कोत रेल्वेची धडक बसून पश्चिम बंगालमधील मजूर रामनाथ राजवर (24) याचा जागीच मृत्यूझाला. तो रोजंदारीवर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वास्को येथील राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाण पुलाखालील रेल्वे रुळाच्या बाजूने रामनाथ राजवर चालत जाताना, त्याला मागून मालवाहू रेल्वेची धडक बसली. रेल्वेच्या धडकेने रामनाथ याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे बाजूस असलेल्या उड्डाण पूल बनविणाऱ्या कामगारांनी दिली. या घटनेची माहिती वास्को पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. राजनाथ याचा मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.