रेलमार्ग दुपदरीकरणास विरोध : आल्मेदा

0
245

दक्षिणमध्य रेल्वेच्या दुपदरीकरणास आपलाही विरोध असल्याचे काल सत्ताधारी भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काल एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले. भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांच्यानंतर रेल्वे दुपरीकरणास विरोध करणारे ते सत्ताधारी भाजपचे दुसरे आमदार ठरले आहेत.

रेल्वे दुपदरीकरणास विरोध करताना काल आल्मेदा म्हणाले की या रेल्वे मार्गासाठी लोकांनी आपल्या जमिनी दिलेल्या असून रेल्वेमार्ग उभारण्यासाठी लोकांची घरेही पाडण्यात आलेली आहेत. आता या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करायचे झाल्यास त्यासाठी लोकांची आणखी घरे पाडावी लागतील. शिवाय बर्‍याच लोकांना आपल्या जमिनीही गमवाव्या लागतील. त्यामुळे रेल्वे दुपदरीकरणास आपला तीव्र विरोध असल्यास आल्मेदा यानी स्पष्ट केले.

या रेल्वेमार्गासाठी स्थानिक लोकांनी आपले सर्व काही गमवावे असे सरकारला वाटत आहे काय, असा प्रश्‍न करून या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असल्याने आपण त्यांच्यासाठी पाठीशी उभा राहणार असल्याचे आल्मेदा यांनी स्पष्ट केले.
कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यानीही या दुपदरीकरणास तीव्र विरोध केलेला आहे.