रुपयाच्या पुन्हा गटांगळ्या; डॉलरच्या तुलनेत ८३ वर!

0
11

रुपया घसरत नसून डॉलरची किंमत वाढते आहे, या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विधानानंतर आधीच घसरणीला लागलेल्या रुपयाबद्दल बाजारात चिंतेचे वातावरण वाढले होते. त्यातच रुपयाचा उलटा प्रवास अजूनही थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी रुपयाने नवा नीचांक नोंदवला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची थेट ८३वर घसरण झाली.