रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता

0
12

गोव्यातील एक राजकीय पक्ष असलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. 2022 साली गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला मिळालेले यश लक्षात घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने सदर पक्षाला गोव्यातील प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी पक्षाचे चिन्ह (आरक्षण व वितरण) आदेश, 1968 च्या परिच्छेद 6, 4 या मधील सगळ्या अटी पक्षाने पूर्ण केल्या असल्याचे दिसून आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने रिव्होल्युशनरी गोवन्सला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना भारतीय निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे तसे कळवले आहे. रिव्होल्युशनरी गोवन्ससाठी आयोगाने ‘फुटबॉल’ हे पक्षाचे चिन्ह म्हणून राखून ठेवले आहे.