रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब पुन्हा सक्रिय

0
2

राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर गायब झालेले रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजीपी) पक्षाचे प्रमुख मनोज परब हे नववर्षात पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. मनोज परब यांनी सोशल मीडियावर ‘लेट्स रिव्होल्युशनाईज 2025′ अशी एक पोस्ट नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर केली आहे.
रिव्होल्युशनरी गोवन्स हा प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे. या प्रादेशिक पक्षाने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविली होती. या लोकसभा निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्सला मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. या लोकसभा निवडणुकीनंतर आरजीपीचे प्रमुख मनोज परब हे गायब झाले होते. त्यामुळे राजकीय पातळीवर तर्कवितर्क लढवले जात होते. मनोज परब यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला जात होता. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक घटना घडल्या; मात्र मनोज परब यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. या प्रादेशिक पक्षाचा एकमेव आमदार विरेश बोरकर हेच केवळ सक्रिय होते.
आता, नवीन वर्षात मनोज परब यांनी सोशल मीडियावर पोस्ट घालून समर्थकांना पुन्हा जमविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आरजीपीच्या समर्थकांनी सोशल मीडियावरील पोस्टला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.