रिझवी, पूजाचे सोनेरी यश

0
125

राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंनी १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात पहिले तीन क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. शहाझार रिझवीने सुवर्ण, ओमकार सिंगने रौप्य तर जीतू रायने कांस्यपदक जिंकून भारताचे वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पूजा घाटकरने २४९.८ गुणांसह सुवर्णपदकावर नेम साधला तर भारताच्याच अंजुम मुदगिलने २४८.७ गुण घेत रौप्य पदकाची कमाई केली. याच प्रकारात मेघना सज्जनार १८३.८ गुणांसह पाचव्या स्थानी राहिली. तत्पूर्वी, पात्रता फेरीत सज्जनारने ४१६.६ गुण मिळवून तिसर्‍या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या स्कीट प्रकारा रश्मी राठोडने ७५ पैकी ६५ गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, तिला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. अन्य दोन भारतीय खेळाडू महेश्‍वरी चौहान व सानिया शेख यांना अनुक्रमे ६४ व ६२ गुण घेता आले.