रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दासना कोरोना

0
97

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली. या आजाराची कुठलीही लक्षणे नसल्याचे त्यांनी म्हटले असून आयसोलेशनमधून आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. श्री. दास म्हणाले की, माझी प्रकृती उत्तम असून नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सांगू इच्छितो की, माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी रिझर्व्ह बँकेचे कामकाज हे नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.