रिक्षाला धडक; कारचालक ठार

0
83

सिल्वावाडो असोळणा येथे उभी असलेल्या मालवाहू रिक्षाला फियाट कारची धडक बसून कारचालक बोनिफासियू कारिदास फर्नांडिस (८४) हा वृध्द ठार तर रिक्षाचालक पिंटू जखमी झाला. काल जीए- ०५ टी- ३३५४ क्रमांकाची मालवाहू रिक्षा वेर्णाहून पिंटू असोळणा येथे माल घेऊन गेला होता. असोळणा येथे रस्त्यालगत रिक्षा उभी करून राहिला होता. इतक्यात जीए- ०२- ए- १७२१ क्रमांकाची फियाट कार घेऊन बोनाफासियू फर्नांडिस भरवेगाने आला व त्याची धडक रिक्षाला बसून पिंटू जखमी झाला तर फियाट कारचालक बोनिफासीयू ठार झाला. पिंटू हा मूळ बिहार येथील असून वेर्णा येथे राहत होता. त्याला ऑस्पिसियु हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.