>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती
देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटी कौन्सिलने स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या गटाची तिसरी बैठक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे काल घेण्यात आली.
रिअल इस्टेट मंत्रीगटाची बैठक सकारात्मक झाली. औद्योगिक भूखंड, गृहनिर्माण पुनर्बांधणी आणि गृहनिर्माण सोसायटी यांच्यावरील जीएसटी कमी करण्यावर चर्चा करण्यात आली. रिअल इस्टेट मंत्रिगटाची पुढील बैठक गोव्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
या बैठकीत रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर आणि राज्य सरकारांच्या निवेदनांवर चर्चा करण्यात आली. कौन्सिलने प्रत्येक मुद्यावर तपशीलवार महसूल परिणाम आणि इतर समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व राज्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.