रिअल एजन्सीला पाच कर्मचार्यानी १४ लाख रुपयांना ठकविल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत डी. कदम यांनी मडगांव पोलिस स्टेशनवर नोंदविली आहे. स्मीता गुरुदास नाईक (बाळ्ळी), दत्ता महादेव देविदास (रिवण), मिलाग्रीस आंतांव (शिरोडा), सुदेश नाईक (नावेली) व बसप्पा हरिजन या माजी कर्मचार्यांनी २०१३ ते मे २०१४ पर्यंतच्या काळांत वितरीत केलेल्या बियरचे १३ लाख ८८ हजार ७९ रुपये कंपनीच्या खात्यात भरले नाहीत. ती रक्कम परस्पर गिळंकृत करून कंपनीला फसविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मडगांव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.