शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारले. न्यायालयाने 14 जुलै 2014 रोजी या प्रकरणी निकाल दिला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातही आदेश दिले; पण त्यानंतरही कारवाई होत नसेल, तर न्यायालयाला नाईलाजाने त्यांना 2 महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, असे न्यायालयाने नार्वेकरांना सज्जड दम भरताना म्हटले. राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.