राहुल गांधी यांच्याकडून अनोखी दिवाळी साजरी

0
9

दिवाळीला सुरुवात झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी, गोडधोड मिळाईच्या पदार्थांची रेलचेल दिसून येत आहे. यादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे 237 वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई तयार करण्याचा अनुभव घेतला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यात राहुल गांधी हे दुकानाची पाहणी करताना आणि बेसनचे लाडू वळताना दिसत आहेत.