काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाच्या मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालायने सुनावलेल्या या शिक्षेविरोधात त्यांनी सूरत सत्र न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र सूरत न्यायालयाने काल त्यांची याचिकाच फेटाळून लावली. याचिका फेटाळून लावताना सूरत न्यायालायने राहुल गांधींना खडेबोल देखील सुनावले.