राहुल गांधींची शिक्षा कायम

0
2

मोदी आडनाव मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने काल फेटाळली. राहुल गांधींना न्यायालयाने कोणाताही दिलासा दिला नाही. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. राहुल गांधींसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. आता या प्रकरणी राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात राहुल गांधींना सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.