नॅशनल हेराल्ड प्रकरणात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग चार दिवस चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा शुक्रवारी ईडी कार्यालयात बोलावले होते; मात्र राहुल गांधींनी आपल्या आई अर्थात सोनिया गांधींच्या तब्येतीचे कारण देत तीन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती ईडीने काल मान्य केली. त्यामुळे राहुल गांधींना काहीसा दिलासा मिळाला असून, आता त्यांची सोमवारी पुन्हा चौकशी होणार आहे. कालच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींना सुमारे ३५ प्रश्न विचारण्यात आले.