काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल शेअर बाजार घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. त्यासंबंधीचे ट्विट श्री. पाटकर यांनी केले असून त्यात हा एक महाघोटाळा असून छोट्या गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच ेम्हटले आहे. मोदी-शहा, भाजप व त्यांचे गर्भश्रीमंत उद्योगपती यांच्यातील साटेलोटे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी उघड केले असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष भारतातील लोकांचा आवाज बनून कार्य करत राहणार असल्याचे पाटकर यांनी यावेळी सांगितले.