राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा महोत्सव पणजीत २५ पासून

0
173

गोवा मनोरंजन सोसायटीने २५ मे ते ७ जून ह्या दरम्यान रष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त २३ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘पावसाचा निबंध’ ह्या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्या उपस्थितीत २५ मे रोजी संध्याकाळी ६ वा. मॅकॅनीज पॅलेसमध्ये या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट व ‘पावसाचा निबंध’ ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात येणार आहे. २६ मे रोजी ‘मॉम’ (हिंदी), नगरकिर्तन (बंगाली), ‘हॅलो आरसी’ (उडीया), २७ मे रोजी आलोसक्कम (मल्याळम), ‘सिंजर’ (जसरी), वॉकिंग विथ द विंड (लडाखी), २८ रोजी ‘न्यूटन’, २९ रोज थोंडीमुथ्याल्लम द्रिकसाक्षीय्‌म’, ३० रोजी ‘म्होरक्या’ (मराठी) ३१ मे रोजी डीएच्‌एच (गुजराती), १ जून रोजी ’पड्डई’ (तुळू), २ जून रोजी ‘हेब्बेत रामक्का’ (कन्नड), टेक ऑफ (मल्याळम), ‘इशू’ (आसामी), ३ जून रोजी ‘गाझी’ (तुळू), ‘टू लॅट’ (तामिळ), ‘मयुरक्षी’ (बंगाली), ४ जून रोजी ‘इशदा (हिंदी), ५ जून रोजी ‘भयनाकम’ (मल्याळम), ६ जून ‘धप्पा’ (मराठी), ७ जून वॉटरबेबी (इंग्लीश-कोंकणी) व ‘व्हिलेज रॉकस्टार’ (आसामी) हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.