37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सांगता सोहळा गुरुवार दि. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार असून, या सोहळ्याला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फातोर्डा-मडगाव येथील स्टेडियममध्ये 26 ऑक्टोबरला करण्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.