राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार

0
12

>> राष्ट्रवादीचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांची माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आघाडी करून गोवा विधानसभा निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाशी आघाडीसाठी प्रयत्न केला होता; मात्र कॉंग्रेसकडून योग्य प्रतिसाद लाभला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीचे उमेदवार लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असेही पटेल यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व इतरांची उपस्थिती होती.

गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असे कॉंग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार आहे. गोव्यात आम्हाला यश मिळेल. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल, असे संजय राऊत म्हणाले.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी होणार असून, उमेदवारांची पहिली यादी आम्ही गुरुवारी जाहीर करणार आहोत आणि तीन-चार दिवसांनंतर दुसरी यादी जाहीर केली जाईल.
प्रफुल्ल पटेल,
गोवा प्रभारी, राष्ट्रवादी.