शरद पवार हे कधी काय करतील व कोणती भूमिका घेतील हे सांगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया काल राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एक माजी नेते ट्रॉजन डिमेलो यांनी दिली. सगळे विरोधी पक्ष केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात एकत्र येऊ पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली ही फूट म्हणजे एक मोठी चिंतेची बाब असल्याचे डिमेलो म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाने पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवार यांना महाराष्ट्रातील भाजप आघाडी सरकारला जो पाठिंबा दिला आहे, त्याला शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असावा, असे डिमेलो म्हणाले.