महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भ्रष्टाचारविरोधी विभागाद्वारे चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंजुरी दिली आहे. अजित पवार, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या आरोपांची शहानिशा करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.