राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. ‘लोक आम्हाला पुन्हा सलग चौथ्यांदा निवडून देतील’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सभेला संबोधित करताना पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी एका लाटेची चर्चा होती. पण लोकसभा व राज्यसभा निवडणुकांत फरक असतो. राज्याचे लोक विचारपूर्वक योग्य हातात सत्ता सोपवतील, असे ते म्हणाले.