>> राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक
राष्ट्रपतीपदाची आज होणारी निवडणूक ही धर्मांध विचारसरणी विरोधातील लढाई असल्याची प्रतिक्रिया काल कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. विजयासाठी आपणाकडे संख्या नसली तरीही ही लढाई पूर्ण ताकदीनिशी लढायलाच हवी असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आज तर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठकीवेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाचे आपले उमेदवार अनुक्रमे मीराकुमार व गोपाल गांधी यांच्या उपस्थितीत श्रीमती गांधी बोलत होत्या.
दरम्यान मध्यप्रदेशचे एक मंत्री नयेत्तम मिश्रा यांना आजच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने अपात्र ठरविले ओ. पेड न्यूज प्रकरणी आरोपांवरून मिश्रा यांना तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.