राष्ट्रध्वजाचा अवमान; एकाविरुद्ध गुन्हा नोंद

0
31

जुने गोवे पोलिसांनी सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाची कथित आक्षेपार्ह प्रतिमा पोस्ट केल्याबद्दल सांताक्रूझ येथील एका व्यक्तीवर राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नाझारियो डिसूझा असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 500 आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.